ताज्या बातम्या

Kunkeshwar Temple Dress Code : सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. श्रावण महिन्यात कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

भाविकांनी फाटलेल्या जीन्स किंवा उत्तेजक कपडे परिधान करुन मंदिरात येऊ नये. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे, हिंदू धर्माचं पालन करुन मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती नसेल त्यांच्यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे सोय करण्यात आली आहे.येणाऱ्या भाविकांनी देवस्थानला सहकार्य करुन वस्त्रसंहितेचं पालन करावे. देवस्थान ट्रस्टने सांगितले आहे.

अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करु नये. भक्तांनी या नियमांचे पालन करुन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे. ज्या भाविकांना याची माहिती नसेल त्यांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी आदी वस्त्रे मोफत देण्यात येतील. दर्शनानंतर ती वस्त्रे परत घेतली जाणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...