निसार शेख|चिपळूण: महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी येथील चौथा टप्प्यातील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली असून येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्याची वीजनिर्मितीही बंद होण्याच्या मार्गावर आहे कोयना धरणातील पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहे.
चौथा टप्पा बंद झाला असून उर्वरित टप्पेदेखील पाण्याअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत चिपळूण परिसरात पाणी टंचाई उद्भवण्याचा मोठा धोका आहे. कोयनेच्या अवजलावर चिपळूण व वाशिष्ठी नदीलगतची गावे तसेच लोटे, गाणे-खडपोली, आरजीपीपीएल, खेर्डी येथील औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. जर वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली तर मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जाण्याचा धोका आहे.धरणात शिल्लक असलेले पाणी मृगजल ठरले आहे.
सकाळी व सायंकाळी विजेची नितांत गरज असताना कोयना वीज प्रकल्प चालविला जातो. पाण्यावर होणारी वीज ही सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे अतिउच्च मागणीच्यावेळी कोयना वीज प्रकल्प चालवून विजेची गरज भागवली जाते. कोयना धरणाची जलसाठवण क्षमता १०५ टीएमसी असून १ जूनपासून जलवर्ष सुरू होते त्यानंतर धरणात जमा होणारे पावसाचे पाणी मोजले जाते. मात्र, या वर्षी जूनचा निम्मा महिना संपत आला तरी पावसाने जोर धरलेला नाही.
त्यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी खालावली जलवर्षात मात्र कोयना वीज प्रकल्पावर पाणी संकट आहे. सध्या धरणामध्ये ११.७४ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे चौथा टप्पा पूर्णपणे ठप्प झाला असून कोयना नदीला १०५० क्युसेस पाणी सिंचनासाठी दिवसांत जोरदार पाऊस धरणातून सोडले जात आहे. कोयना धरण क्षेत्रात पाणी साठा वाढला नाही तर पहिला, दुसरा व तिसरा टप्पादेखील ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. पाऊस न झाल्यास भारनियमनाचे संकट देखील ओढवणार आहे.