भारत गोरेगावकर, रायगड
कोकणात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यातच कोकणातील बहुतांश जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, सिंधुदुर्गात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यात अंबा, पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडल्याने नागोठणे आणि खापोली परिसराला याचा फटका बसला आहे.
यासोबतच जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक नद्यांचे पाणी लगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांचे तात्पुरते त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. यासोबतच सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.