ताज्या बातम्या

Konkan Rain Update : कोकणासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी

राज्यामध्ये सध्या सगळीकडेच मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे.

Published by : shweta walge

राज्यामध्ये सध्या सगळीकडेच मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. यातच कोकणात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता दर्शवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून सतर्कतेचा इशारा देखिल देण्यात आला आहे. कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोकणात अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रायगडच्या समुद्राला उधाण आले आहे. दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी २०५ मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. तर, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग ५०-६० किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत आज अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ५०-६० किमी प्रति तासाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात १५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश