कोलकाता या ठिकाणी 9 ऑगस्टला एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. यानंतर ज्युनियर डॉक्टर आणि इतर सहकाऱ्यांनी संप पुकारला होता. आता हा संप मागे घेण्यात आला आहे.
कोलकाता येथील संप 41 दिवसांनी मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत असून आर.जी. कर रुग्णालयाचे डॉक्टर कामावर परतणार आहेत. 21 सप्टेंबरपासून सगळे डॉक्टर कामावर परतणार आहेत.
20 सप्टेंबरला संप जाहीरपणे मागे घेतला जाईल आणि 21 सप्टेंबरपासून डॉक्टर कामावर परततील अशी माहिती मिळत असून दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चर्चा झाली होती. तब्बल 41 दिवसांचा हा संप मिटला असून उद्यापासून डॉक्टर कामावर येणार आहेत.
कोलकात्यातील या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी या ज्युनियर डॉक्टरांनी संप पुकारला होता. तब्बल 41 दिवसांचा हा संप मिटला असून उद्यापासून डॉक्टर कामावर येणार आहेत.