ताज्या बातम्या

Kolhapur: लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला इजा; गणेश मंडळांना लेझर लाईट न वापरण्याचं पोलिसांचं आवाहन

कोल्हापूर शहरा शेजारील उचगाव गावात देखील बाप्पाचे मोठया जल्लोषात आमगण झाले. कोल्हापुरात लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला इजा झाली आहे.

Published by : Team Lokshahi

कोल्हापूर शहरा शेजारील उचगाव गावात देखील बाप्पाचे मोठया जल्लोषात आमगण झाले. कोल्हापुरात लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला इजा झाली आणि लेझर लाईटच्या प्रखर विद्युतझोतामुळे डोळ्यातून रक्तस्त्राव झाल्याचे देखील समोर आले आहे. उचगावातील गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान ही घटना समोर आली आहे. पोलिसांनाही लेझर लाईटचा त्रास झाल्याची माहिती मिळाली आहे. तरी जखमी तरुणावर शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान, गणेश आगमन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभारलेल्या एका पोलिसाच्या डोळ्यालाही या लेसर किरणांमुळे इजा झाली. त्यामुळें विघ्हर्त्याच्या आगमनातच लेझर शोचे विग्न आल्यामुळे अनेकांना डोळे गमवायची वेळ आली आहे. जखमी तरुण आदित्य बोडके याच्यासह ड्युटीवर असणार्या एका पोलिस कर्माऱ्यांला देखील लेझर शो चा फटका बसला असून त्याच्यावर देखील उपचार केलें जातं आहेत. एकीकडे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेश विसर्जन असो किंवा मिरवणूक यामध्ये लेजर लाईट्स वापरू नये असं आवाहन केलं होतं.पण सर्रास गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मात्र गणेश आगमन मिरवणुकीमध्ये थेट लेजर शो मोठ्या प्रमाणात वापरल्याच दिसून आलं

कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली आहे. कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री आठ नंतर गर्दी वाढते. बिनखांबी गणेश मंदिर आणि महाद्वार चौक या मिक्सिंग पॉईंटला मंडळांचा प्रवेश होताच गर्दी आणि चेंगराचेंगरीचे प्रकार घडतात. हा प्रकार टाळण्यासाठी मिरवणूक मार्गावर सहा ठिकाणी आपत्कालीन मार्ग असणारेत तर नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. लेसर लाईट वापरू नये यासाठी मंडळांसोबत बैठका सुरू असून याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी म्हटलं आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती