ताज्या बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी २१ फूट ११ इंचावर पोहचल्याची माहिती मिळत आहे. १४ बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगा, वारणा, भोगावती आणि कासारी नदी वरील 14 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने राधानगरी, शाहूवाडी आजारा चंदगड शिराळा तालुक्यातील प्रकल्पात अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद करण्यात आली आहे. राधानगरी धरण 33.22% भरलं तर धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरूच आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

गेल्या 24 तासात तुळशी धरण क्षेत्रामध्ये 202 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश