Kolhapur Suicide Case Team Lokshahi
ताज्या बातम्या

कौटुंबिक वाद शिगेला; महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या

महिला पोलिसानेच हे पाऊल उचलल्याने इतर महिलांचं काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.

Published by : Sudhir Kakde

कोल्हापुर प्रतिनिधी | सतेज औंधकर : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल योगिनी सुकुमार पवार यांनी आत्महत्या (Police Constable Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस लाईन कसबा बावडा यांनी कौटुंबिक वादातून गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केली. त्या 36 वर्षांच्या होत्या. कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये आज दुपारी ही घटना घडली.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरीचे राजेश गवळी यांनी लगेचच घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पोवार यांनी लिहिलेली चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.

दरम्यान, कौटुंबिक वादातून महिला कॉन्स्टेबल पवार यांनी स्वतःची जीवन यात्रा संपवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलल्यानं पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाहूपूरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Latest Marathi News Updates live: नाना पटोलेंनी दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे