कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने दोन गटामध्ये तेढ निर्माण झाला आहे. या घटनेनंतर आज कोल्हापूर हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्यानंतर कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली
बुधवारी (7) सायंकाळी 5 वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद ठेऊन गुरुवारी ( 8) रात्री 12 पर्यंत इंटरनेट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. अद्याप इंटरनेट सेवा सुरु झाली नसल्याने डिजिटल व्यवहारावर परिणाम झाला आहे.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माहिती दिली आहे की, आज शुक्रवारी (9) सकाळी 10 नंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होणार आहे. आता कोल्हापूरमध्ये इंटरनेट सेवा कधी पूर्ववत होणार याकडे लक्ष लागले आहे.