कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक गोकुळ संघाच्या अध्यक्षपदी अरुण डोंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज डोंगळे यांनी अध्यपदाची सूत्रे घेतली.गोकुळ अध्यक्षपदाचा विश्वास पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.
त्यानंतर आता अध्यक्षपदी अरुण डोंगळे बसले आहेत. याची निवड प्रक्रिया गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयात झाली.