ताज्या बातम्या

Buldhana Accident : बुलढाण्यात खासगी बसचा नेमका अपघात कसा झाला?

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे.

Published by : Siddhi Naringrekar

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावात हा भीषण अपघात झाला. बस डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर बसने पेट घेतला आणि त्यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

बसचा टायर फुटला. त्यामुळे बस खांबाला जाऊन धडकली. त्यानंतर ही बस अनियंत्रित झाली आणि समृद्धी महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन आदळली. त्यामुळे बस पलटी झाली. बस पलटी होताच बसला भीषण आग लागली. काही प्रवाशांनी काचेची खिडकी तोडली आणि बाहेर पडले. या अपघातातून ड्रायव्हरसह 8 जण बचावले आहेत. मात्र 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रॅव्हल्स कंपनीकडील प्रवाशांची यादी घेऊन या मृतांची ओळख पटवली जात आहे. या अपघातातील मृतांची ओळख पटणं मुश्कील झालं आहे. कारण मृतांचे चेहरे जळले आहे.

वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवली असून बस बाजूला करण्याचं काम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोणाताही आयडी प्रूफ शिल्लक नसल्याने या मृतांची ओळख पटणं मुश्किल झालं आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...