Team India  
ताज्या बातम्या

T20 World Cup : प्रतिस्पर्धी संघांचे धाबे दणाणणार! रोहित शर्माची पलटण मैदानात उतरणार ; 'अशी' असेल भारताची संभाव्य प्लेईंग ११

Published by : Naresh Shende

Team India Playing 11 Prediction For T20 World Cup : टी-२० वर्ल्डकपची रणधुमाळी येत्या २ जूनला सुरु होणार असून टीम इंडियाची घोषणा नुकतीच करण्यात आलीय. आयसीसी ट्रॉफी जिंकणं प्रत्येक कर्णधाराचं स्वप्न असतं. भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यासाठी रोहित शर्माही प्रयत्नांची पराकाष्टा करणार, यात तीळमात्र शंका नाही. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघात रिषभ पंत आणि संजू सॅमसन दोघांनाही संधी देण्यात आली आहे. याशिवाय संघात चार फिरकीपटूही आहेत. शुबमन गिलचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश केला आहे. तर शिवम दुबेचीही भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा/ शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव/मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग

खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार टीम इंडियाची प्लेईंग ११ निवडली जाणार असल्याचं रोहित शर्माने आधीच स्पष्ट केलं आहे. रोहित शर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाला, भारतीय संघ आधी वेस्टइंडिजमध्ये जाणार आहे. तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर आणि खेळपट्टीचा अंदाज घेतल्यावर प्लेईंग ११ बाबत विचार केला जाईल. यापूर्वी आम्ही न्यूयॉर्कमध्ये खेळलो नाही. त्यामुळे तेथील खेळपट्टीबाबत आताच सांगता येणार नाही.

भारतीय संघात मधल्या क्रमवारीत जास्तीत जास्त आक्रमक फलंदाज उपलब्ध कसे होतील, यावर जास्त फोकस करण्यात आलं आहे. टॉप ऑर्डरमध्ये मोठे फटके मारणारे फलंदाज भारतीय संघात आहेत. पण मध्यमक्रमवारीत धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी शिवम दुबेची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू