RCB vs CSK 
ताज्या बातम्या

CSK vs RCB : सामन्यात पावसाने खोडा घातल्यास बंगळुरुच्या अडचणी वाढणार? काय आहे समीकरण? जाणून घ्या

Published by : Naresh Shende

RCB Playoffs Scenarios : इंडियन प्रीमियर लीग २०२४ आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. प्ले ऑफच्या अन्य दोन जागांसाठी चेन्नई सुपर किंग्ज, आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. आरसीबी आणि सीएसके यांच्यात प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी १८ मे ला निर्णायक सामना होणार आहे. प्ले ऑफ मध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. आरसीबीचा या सामन्यात पराभव झाल्यात त्यांचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होईल. आरसीबी आणि सीएसकेच्या सामन्यात पावसाचं सावटही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरसीबीच्या गोटात टेन्शन वाढलं आहे. पावसामुळे सामन्यातील षटक कमी केले, तर आरसीबी प्ले ऑफमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या.

आरसीबीला प्ले ऑफमध्ये जागा निश्चित करायची असल्यास टीमला २० षटकांच्या सामन्यात १८ किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी जिंकावं लागेल. जर आरसीबीला चेज करण्याची संधी मिळाली, तर संघाला १८.१ षटकात सीएसकेकडून दिलेलं लक्ष्य गाठावं लागेल. या सामन्यात पाऊस पडला आणि आरसीबी-सीएसके सामना ५-५ षटकांचा झाला, तर आरसीबीला त्यांचा माईंड सेट २० षटकांच्या सामन्याप्रमाणेच ठेवावा लागेल. आरसीबीला जर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर संघाला पाच षटकांमध्ये कमीत कमी ९० किंवा १०० धावा कराव्या लागतील. त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांना चेन्नईच्या संघाला ५० किंवा ६० धावांमध्ये रोखावं लागेल.

जर चेन्नई सुपर किंग्जने ५ षटकांच्या सामन्यात ५०-६० धावा केल्या. तर आरसीबीला या धावा तीन षटकांमध्ये चेज करावं लागेल. अशा परिस्थितीत आरसीबीचा माईंडसेट २० षटकांच्या सामन्यांप्रमाणे ठेवावा लागेल. म्हणजेच संघाला एकतर १८ किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी जिंकावं लागेल किंवा त्यांना ११ चेंडू राखून लक्ष्य गाठावं लागेल. आरसीबीचे गुणतालिकेत १२ गुण आहेत. त्यांचा रनरेट ०.३८७ इतका आहे. तर सीएसकेचे १४ गुण असून त्यांचा रनरेट ०.५२८ इतका आहे. अशातच आरसीबीला जर सीएसकेच्या रनरेटला मागे टाकायचं असेल आणि प्ले ऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर याच समीकरणाप्रमाणे खेळावं लागेल.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा