शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (17मार्चला) विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. तसेच, विविध घोषणा करत शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. परंतु, याची अंमलबजावणी होत नाही तोवर आम्ही वाट पाहणार आहोत. तोपर्यंत मुक्काम करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार जे.पी. गावित यांनी दिली आहे.
या शेतकरी लाँग मार्चच्या दरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५ वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.