मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) 'मातोश्री' या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या उद्दिष्टाने मुंबईत दाखल झालेल्या आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा (Ravi Rana & Navneet Rana) यांना दिवसभराच्या राजकीय नाट्यानंतर काल खार पोलिसांनी अटक केली. दरम्यान, ह्या दोघांची भेट घेऊन चौकशी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकात जात असताना संतप्त शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. दगडफेकीमध्ये सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली अन् त्या काचेने किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) जखमी झाले. ह्या सर्व घटनांमुळे आता राज्यातील राजकीय परिस्थिती चांगलीच तापली आहे. भाजप महाविकासआघाडी विरूद्ध (MVA Goverment) चांगलीच आक्रमक झाली आहे.
आज (24-04-2022) भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
पत्रकार परिषदेतील महत्तवाचे मुद्दे:
माझ्यावरील हल्ल्यासाठी पोलीस कमिशनर संजय पांडेच सर्वस्वी जबाबदार.
मला पोलीस स्टेशनमधील डीसीपींनी धमकी दिली.
काल शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्यात पोलिसही सामील होते.
केंद्र सरकारने दिलेल्या संरक्षणामूळे मी जिवंत राहीलो.
काल मला लागलेली काच जर 4 इंच वर लागली असती तर, कदाचित मी आंधळा झालो असतो.
उद्या भाजपचे एक शिष्टमंडळ केंद्र सरकारच्या गृह सचिवांना भेटणार.
उद्धव ठाकरे पोलिसांचा केवळ माफिया म्हणून वापर करू शकतात.
हा माझ्यावरील तीसरा जीवघेणा हल्ला.
मी शिवसेनेला माफिया सेना'च म्हणणार.
ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच.
मला मारणारा अजून जन्माला यायचा आहे.
माझ्या सहीशिवाय बोगस कंप्लेंट संजय पांडेंना रजिस्टर केली.
महाराष्ट्राला घोटाळेमूक्त करण्यासाठी भाजप आक्रमक होती व आक्रमकच राहणार.