Kirit Somaiya sanjay raut admin
ताज्या बातम्या

किरीट सोमय्या नॉट रिचेबल, संजय राऊत यांनी केला फरार झाल्याचा आरोप

Published by : Team Lokshahi

भाजपचे नेते किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी लूक आऊट नोटीस काढा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) फरार असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. हे दोघे मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान लोकशाही न्यूजने सोमय्या यांच्यांशी संपर्क केला असता ते नॉट रिचेबल होते. त्यांचा फोन दुसऱ्या कोणाकडे होता. त्यांनीही फोन कट केला.

ट्वीटमध्ये काय आहे

किरीट सोमय्या मुलगा निलसह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली तरी सत्याचाच विजय होईल असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आता राऊतांच्या या वक्तव्यावर सोमय्या काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारताची विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' वर संग्रहालय करण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी निधी गोळा केला होता. मात्र, हा निधी सोमय्या यांनी व्यवसायासाठी वापरला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला असून या प्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर मुंबईत (Mumbai) गुन्हा दाखल झाला आहे

काय आहे प्रकरण

INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजभवनाने आपल्याला सोमय्यांकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचे म्हटले आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

रिझर्व्ह बँकेने आज नियमांच्या अंमलबजावणीतील तृटींसंदर्भात अॅक्सीस बँकेला ९३ लाखांचा व आयडीबीआय बँकेला ९० लाखांचा दंड ठोठावला आहे. कर्जे देणे, दंडआकारणी, केवायसी सेवा व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक नसणे यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अॅक्सीस बँकेवर ही कारवाई केली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी