केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची कायदा मंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. तर आता ही जबाबदारी अर्जुनराम मेघवाल यांना देण्यात आली आहे. तसेच किरेन रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाचा पोर्टफोलिओ सोपविला जाईल. असी माहिती राष्ट्रपती भवनने दिली आहे.
मेघवाल हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते. ते मूळचे राजस्थानचे आहेत. अर्जुन राम मेघवाल हे सध्या संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्याकडे आता कायदा आणि न्याय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.