ताज्या बातम्या

हिंदू मुस्लिम वादाची साक्ष आणि ऐक्याच प्रतीक धुळ्यातील "खुनि गणपती"

Published by : Dhanshree Shintre

विशाल ठाकुर | धुळे: "खुनि गणपती" नाव वाचून आश्चर्य वाटलं नं? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे...! धुळ्यातील खुनि गणपतीची - खुनि मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा...!

1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाच रुपांतर हाणामारीत झाल्यानं ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, अनेक जखमी झाले आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वकतले तथा खून पडनात"... या चर्चांमूळे मशिदीला खुनि मशिद आणि गणपतीला खुनि गणपती नाव प्रचलीत झालं...! त्यावेळी तणाव निर्माण झाल्याने तब्बल 5 दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता.

पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून 228 रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली.

दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपारीक टाळ-मृदुंगाच्या गजरात तिनपावली, बारापावली नृत्य होत, बरोबर सायंकाळी 5 वाजता, म्हणजेच नमाजची अजान होताना खुनि गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते, मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीतूनच एक धर्माधिकारी येतो, तिथूनच आरतीचं तबक आणि गुलाबाच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती केली जाते. एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरु होते. तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो.

याठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविक सांगतात. हिंदू मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे. आणि दोन्ही धर्मीयांनी ती आजतागायत जपलीय.

आठ-दहा लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे सोडलं तर बाप्पाचं हे आगळं रुप जास्त कुणाला माहित नाही. जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही प्रथा जपलीय. त्यामूळे या इतिहास आणि वेगळेपणाचा इव्हेंट होण्यापासून वाचलाय. जसं 1895-1896 मध्ये होतं तसंच तंतोतंत आजही पाळलं जातंय. धुळ्यात आल्यानंतर, जुने धुळे विचारलं की खुनि मशिद हाच बसथांबा आजही आहे. जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय, तस जुन्या धुळ्याने हिंदूबहूल कॉलनीतली / पेठेतली लोकांनी मशिद पावित्र्याने जपलीय.

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग