Sanjay Raut Team Lokshah
ताज्या बातम्या

"Kashmir Files 2 काढून सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण हे स्पष्ट करावं"

Published by : Sudhir Kakde

मुंबई : काश्मिरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी भाजला घेरण्यास सुरुवात केली आहे. काश्मिरमधल्या हल्ल्यांवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजवर टीका केली आहे. कलम 370 हटवल्यानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) तीच स्थिती कायम आहे.. काश्मिरी पंडितांच्या नशिबात पलायनच आहे. काश्मीर फाईल्स 2 हा चित्रपट काढावा आणि आताच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हे त्यात दाखवण्यात यावे असे राऊत म्हणाले.

गेल्या काही आठवड्यांत जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ होतेय. त्यावरुन विरोधीपक्षाकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं कौतुक करणारे सध्या होणाऱ्या घटनांवर गप्प का आहेत असा सवाल काँग्रेसने केला आहे. टार्गेट किलींगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांमध्ये (Kashmiri Pandit) भय निर्माण झालं आहे. त्याकाळात असणाऱ्या भाजप (BJP) सरकारममुळेच ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता सुद्धा 1990 सारखी परिस्थिती आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा