कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ‘लिप लॉक चॅलेंज’चा (Lip Lock Challenge) म्हणजेच चुंबन स्पर्धेचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे या व्हिडिओचा आधार घेत दोन विद्यार्थींवर अत्याचार केला आहे. या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
चुंबन स्पर्धेचा हा व्हिडिओ एका घरातील खोलीत चित्रित करण्यात आला आहे. यात एकमेकांचं चुंबन घेणाऱ्या तरुण-तरुणीशिवाय त्या खोलीत इतरही विद्यार्थी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. येथील एका अपार्टमेंटमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा व्हिडीओ बनवून दोन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी येथे आठ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३५४, ३५४ (क) तसेच १२० (ब), पोक्सो व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर चुंबनाचा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
फेब्रवारी महिन्यात विद्यार्थ्यांनी सत्य आणि आव्हान (ट्रुथ ऑर डेअर) ही चुंबन स्पर्धा घेतली होती. व्हायरल व्हिडीओत गणवेश घातलेले मुलगा-मुलगी चुंबन घेताना तर अन्य विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन देताना दिसतात. खोलीत उपस्थित विद्यार्थ्यांपैकी एकाने हा व्हिडिओ शूट केला व तो सोशल मीडिया शेअर केला. या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थाचं (Drugs) सेवन केलं होतं की नाही या बाजूनेही प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.