कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला सध्या सुरूवात झाली आहे. निवडणूकीत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळत आहे.
कर्नाटक विधानसभेच्या सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे.काँग्रेस-भाजपमध्ये चुरस वाढली आहे. काँग्रेसने आघाडीचं शतक गाठलं.
कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली.