Karnataka Election Result 2023  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Karnataka Election Result 2023 LIVE : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती मोठा धक्का; सर्वच उमेदवार पराभूत

Karnataka Assembly Election Results 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

Published by : shweta walge

कर्नाटक निवडणुकीत बेळगावमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार पराभूत

कर्नाटक निवडणुकीत बेळगामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का बसला आहे. समितीला सर्वच जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला असून 7 जागांवर भाजपची सरशी झाली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुरलीधर पाटील (खानापूर), रमाकांत कोंडूसकर (बेळगाव दक्षिण), अमर येळ्ळूरकर (बेळगाव उत्तर) आणि आर. एम. चौगुले यांना बेळगाव ग्रामीणमधून पराभव स्वीकारावा लागला आहे.

Big Breaking | मुख्यमंत्री बसवराज बोम्मई विजयी  

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या शिग्गांव मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सलग तीन वेळा विजयी झालेले बोम्मई आता चौथ्यांदा याठिकाणाहून आमदार म्हणून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पठाण यासिर अहमद खान यांचा पराभव केला आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली भीती:                                                       कर्नाटकातील विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय नाट्य घडलं होतं. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले त्याचप्रमाणे कर्नाटकतही भाजपाने सत्ता स्थापन केली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. “ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली, तीच गोष्ट महाराष्ट्राला लागू होते”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

मला आनंद आहे फोडाफोडी करता येणार नाही, जितेंद्र आव्हाडाची पहिली प्रतिक्रिया

Basavaraj Bommai : निकालाचे विश्लेषण करू अन् लोकसभेत कमबॅक करू - बोम्मई                                                                  कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधानापासून भाजपा कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. आम्हाला बहुमत मिळाले नाही. अंतिम निकाल आल्यानंतर आम्ही त्याचे विश्लेषण करू आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत कमबॅक करू असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला

Karnataka Election Results: देशभरातील प्रदेश काँग्रेस कार्यालयांमध्ये जल्लोषाची तयारी सुरू आहे. कलांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष करत आहेत.

सुषमा अंधारे : BJP ने राहुल गांधींना पप्पू ठरवण्याचा प्रयत्न केला, पण पप्पू बाप निघाला!

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार कोण किती जागांवर आघाडीवर? काँग्रेस – १२० भाजपा – ६९ जेडीएस – २६ इतर – ०८

कर्नाटकातील सर्व जागांचे कल आले आहेत. ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी ते अंतिम म्हणता येणार नाही. कारण कर्नाटकात अशा 50 जागा आहेत जिथे काँग्रेस आणि भाजपमधील मतांचा फरक 1 हजारांपेक्षा कमी आहे. काँग्रेसच्या जागा कमी झाल्यास सरकार स्थापन करण्यासाठी जेडीएससोबत भागीदारी करावी लागेल.

Karnataka Election Result : कर्नाटकात विजय दिसताच प्रियांका गांधी पोचल्या हनुमान मंदिरात, जनतेसाठी केली प्रार्थना

कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. सर्व आमदारांना दुसऱ्या राज्यातील हॉटेलमध्ये ठेवणार ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्यात आमदारांना ठेवणार

संजय राऊत : कर्नाटकच्या जनतेनं मोदी, शाह यांना नाकारल कर्नाटकातून देशाची मन की बात बाहेर पडत आहे. कर्नाटकच्या जनतेनं पंतप्रधान मोदी आणि मंत्री अमित शाह यांनी झिडकारलं असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकमध्ये जे झालं तेच 2024 ला देशात होईल असेही राऊत म्हणाले. 

कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकात काँग्रेस १२० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ८२ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस १९ जागांवर आघाडीवर आहे.

Karnataka Election Result : निपाणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील आघाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले या पिछाडीवर आहेत.

Karnataka Election Result :  बेळगावमध्ये मधून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर आघाडीवर आघाडीवर आहे.

Karnataka Election Result 2023 : प्राथमिक कलानुसार कर्नाटकात काँग्रेसला बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

Karnataka Assembly Election Result :  कर्नाटक विधानसभेचे 200 कल हाती आले असून काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसनं शतक पूर्ण केलं आहे. 100 जागांवर काँग्रेस आघाडीवर असून भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जवळपास 150 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भाजप 70 तर काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. कल सातत्यानं बदलत आहेत.

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभेचे 100 कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप 50 तर काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. 

कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. भाजप ५० , काँग्रेस ४० आणि जेडीएस ०६ जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटकात मतमोजणीला सुरुवात

कर्नाटकच्या 224 जागांचा उद्या महत्त्वपूर्ण निकाल येणार आहे. काँग्रेस, भाजप आणि जेडीएसमध्ये तिरंगी लढतीची शक्यता एक्झिट पोलनी वर्तवलेली आहे. कोण मारणार बाजी? भाजप पुन्हा येणार का? काँग्रेसला मिळणार का एकहाती सत्ता की जेडीएस ठरणार किंगमेकर?

कर्नाटक विधानसभेचा किंग कोण हे आज स्पष्ट होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झाले होते. याची मतमोजणी आज पार पडत असून भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यामध्ये तिरंगी लढत होत आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha