कर्नाटक विधानसभा निवडणुकीची चर्चा जोरदार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाची यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 224 सदस्यीय संख्या असणाऱ्या कर्नाटकात 10 मे रोजी निवडणूक होणार असून विधानसभेची मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
आम्ही कर्नाटक निवडणुकीच्या यादीवर चर्चा केली. सोमवारी पुन्हा बैठक घेऊन यादी जाहीर केली जाईल. मी शिग्गांव मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. असे बोम्मई म्हणाले.