भूपेश बारंगे |वर्धा : नागपूर अमरावती महामार्गावरील कारंजा शहरात ग्रामीण रुग्णलायात एकाएकी साफसफाई करून क्लीन होत असल्याने सर्वसामान्याना आश्चर्य वाटत आहे.सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. हे नेमकं घडलं तरी कसं,असे रुग्ण एकमेकांशी चर्चा करत आहे.आता या रुग्णालयात सर्वत्र बदल झालेला पाहायला मिळत असून हा सर्व प्रकार आरोग्य विभागात तुकाराम मुंढे रुजू झाल्याने रुग्णलयात बदल झालेला असल्याची जोरदार शहरात चर्चा आहे.एका अधिकाऱ्यांच्या मुळे जर एवढं बदल होत असेल तर तोच देव माणूस या आरोग्य विभाग राहावं असेही नागरिक बोलत Lokशाहीशी बोलताना सांगितले. शहरातील ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार सुरू होता.अधूनमधून या रुग्णायलायची थातुरमातुर साफसफाई केली जायची.अनेकदा शौचालय घाणीचे साम्राज्य असायचे कधी काळी तर चक्क शौचालयात पाण्याची वानवा असायची.राष्ट्रीय महामार्गवर अनेकदा भीषण अपघात घडतात यात अनेक गंभीरसह किरकोळ जखमी होतात. या रुग्ण उपचारासाठी दाखल केले असतात मात्र उपस्थित डॉक्टराकडून कसेबसे तपासणी करून पुढील उपचारासाठी रेफर करून हलविले जाते.तर कधीकाळी गर्भवती महिला प्रसूती करिता आल्यास त्यांच्यावर उपचार करून कोणतेही कारण सांगून त्यांना नागपूर येथे हलविले जात असल्याचे धक्कादायक प्रकार नुकताच काही दिवसांपूर्वी घडला होता.गवंडी येथील महिला प्रसूती करिता आली असता त्या महिलेला काही तास रुग्णालयात ठेऊन बाळाने गर्भात प्रांत:विधी केल्याचे सांगून महिलेला प्रसूतीकरिता नागपूर येथे पाठविण्यात आले होते.मात्र मेडिकल मध्ये पोहचतात काही वेळातच आईने बाळाला जन्म दिला.त्यावेळी बाळाने कुठेही प्रांत:विधी केली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अनेकदा किरकोळ रुग्णांना या रुग्णालयातून रेफर केले जाते.लगेचच काही वेळात ते नागपूर येथून उपचार करून परत आल्याचे घटना घडल्या आहे.यावरून या रुग्णालयात रुग्णाची हेळसांड होत असल्याचे बोलले जाते. मात्र आता या रुग्णालयात बदल झाला असून कार्यरत डॉक्टर ते शिपाई पर्यंत सर्वच जण टॉपटीप राहत असून सर्वच उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे.या रुग्णालयात कर्तव्यावर असलेलं सर्वजण आता गणवेशात दिसायला लागले आहे. रुग्णालयातील कधी न स्वच्छ राहिलेला परिसरात आता चकाचक दिसत आहे. रुग्णालयात स्वच्छता गृहाचे दिवस पलटले असल्याचे दिसत आहे. नावालाच असलेलं रुग्णालय आता बदल झाल्याने काहीतरी प्रमाणात रुग्णाची सेवा केली जात असल्याचे रुग्णाचे नातेवाईक सांगत आहे.
मुंढेच्या भेटीची चर्चा..।
तुकाराम मुंढे हे नाव अनेकांच्या तोंडात बसले आहे.त्याचे कारणही तसेच आहे.त्याच्या धडक कारवाईने ते प्रसिध्द आहे. नागपूर महानगरपालिका रुजू होताच अनेकांवर कारवाई करत निलंबित केले होते. यामुळे विदर्भात त्यांच्या नावाची चर्चा होती. यातच ते आता नुकतेच आरोग्य विभागात रुजू झाले आहे.या रुजू होताच त्यांची पुन्हा ती धडक कारवाई त्यांनी सुरू केली अन राज्यातील काही भागात 13 जण निलंबित केले .याचीच धडकी कारंजा ग्रामीण रुग्णालयात भरली असल्याचे बोलले जात आहे.या रुग्णालयाच्या अनेक तक्रारी समस्या बाबत असल्याने या रुग्णालयात तुकाराम मुंढे भेट देणार असल्याचे चर्चा आहे. मुंढे हे यवो किंवा न येवो मात्र त्यांच्या येण्याच्या नावाने जर रुग्णालयात बदल होत असेल तर असे अधिकारी त्या जागेवर रुजू राहून सर्वसामान्य न्याय मिळेल अशी भावना रुग्ण व्यक्त करत आहे.
रुग्णालयात चकाचक...
रुग्णालयातील स्वच्छता गृह, परिसर, रुग्णाच्या बेडशीट , नव्याने नळ फिटिंग, रुग्णालय परिसरात खोदण्यात आलेला खड्ड्याचा सभोवताल रेबिन बांधण्यात आली. सिलिंग फॅन, जिथे तिथे घाण पसरली होती ती स्वच्छ करून चकाचक करण्यात आली आहे.
पुन्हा बायोमेट्रिक सुरू...
ग्रामीण रुग्णालयात बायोमेट्रिक लावण्यात आले होते.मात्र ते कालांतराने बंद झाले होते.आता पुन्हा बायोमेट्रिक लावण्यात आले असून सर्वाना यावर थम लावावे लागत असून त्यानंतर महिन्याचा पगार केला जाणार आहे.यावरून या रुग्णालयात गैरहजर कोणीही राहू नये यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने पुन्हा बायोमेट्रिक सुरू केले आहे.