ताज्या बातम्या

रत्नागिरीची अनुया करंबेळकर बनणार मेट्रोची लोको पायलट

परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अनुया करंबेळकर हिची मुंबई मेट्रोच्या लोको पायलटपदी नियुक्ती

Published by : Sagar Pradhan

निसार शेख| रत्नागिरी: शहरालगतच्या नाचणे गावातील सुकन्या अनुया करंबेळकर हिची मुंबईत मेट्रोच्या लोको पायलटपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे नाचणे पंचक्रोशी आणि संपूर्ण तालुक्यातुन अनुयाचे अभिनंदन होत आहे. नाचणे गावात अनुया हिच्या वडिलांचा वेल्डींगचा व्यवसाय आहे. त्यांनी मुलीलाही व्यवसायात रुची असल्यामुळे माहिती दिली होती.

याच आवडीमुळे अनुयाने शिर्के हायस्कुलमधून दहावी झाल्यानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. सी. व्हि. सी.(इलेक्ट्रॉनिक्स) मधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबईतील विवेकानंद महाविद्यालयातून इंस्ट्रुमेंशनचा डिप्लोमा पूर्ण केला. हे शिक्षण घेत असतानाच तिला मुंबई मेट्रोचा संदर्भ मिळाला. पुढे तिने मुंबई मेट्रोच्या लोको पायलट या पोस्टसाठी लेखी परीक्षा, त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत, सायकोमेट्रिक टेस्ट आणि आरोग्य तपासणी असे टप्पे पार केले. या सर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अनुया करंबेळकर हिची मुंबई मेट्रोच्या लोको पायलटपदी नियुक्ती झाली आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश