ताज्या बातम्या

Mumbai Local : थट्टामस्करी पडली महागात, कांदिवलीतलं सीसीटीव्ही फुटेज अंगावर काटा आणणारं!

कांदिवली रेल्वे (railway) स्थानकांवर मित्रांबरोबर मस्ती करत असताना एक तरूण लोकलखाली आल्याची घटना घडली.

Published by : Shweta Chavan-Zagade

कांदिवली रेल्वे (railway) स्थानकांवर मित्रांबरोबर मस्ती करत असताना एक तरूण लोकलखाली आल्याची घटना घडली. हा तरूण रेल्वे स्थानकाच्या कठड्यावर आल्यावर तोल जाऊन समोरून येणाऱ्या रेल्वेला धडक लागल्याचा प्रकार रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी बोरिवली रेल्वे स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून याचा तपास पोलिसांकडून केला जात. ही घटना 21 जुलै रोजी सायंकाळी 4.40 वाजता कांदिवली (Kandivali) रेल्वे स्थानकाची आहे.

बोरिवली रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे. दुसरीकडे, या तरुणासोबत असणारी मुले कोण होती आणि ती कुठून आली होती, तसेच मृत तरुणाचा अपघात झाला आहे, की त्याने आत्महत्या केली, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. सद्य:स्थितीत मृताची ओळख पटलेली नाही, तसेच त्याच्याकडून कोणतीही सुसाइड नोट, मोबाइल फोन किंवा असे कोणतेही कागदपत्र सापडलेले नाही. त्यामुळे अद्याप या तरूणाची ओळख पटू शकली नाही.

बोरिवली जीआरपी पोलीस आता याप्रकरणी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. रेल्वे प्रवास करताना प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येते. मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. आता या तरुणाची आत्महत्या आहे, की अपघात याचा तपास सुरू असला तरी नियमांचे पालन न केल्याने याआधीही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नियमांबाबत अधिक जागरूक राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का