ताज्या बातम्या

Kalyan : बनावट नोटांचा साठा जप्त करत पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या

Published by : Shweta Chavan-Zagade

अमझद खान | कल्याण : भारतीय चलनाच्या बनावट नोटांच्या साठा ( Stock of fake notes ) कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकले आहेत. मुख्य सूत्रधाराचा पोलीस शोधात आहे.

कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस अधिकारी दीपक सरोदे यांना गुप्त माहितीदाराच्या आधारे एक माहिती मिळाली होती की, कल्याण पश्चिमेतील अनिल पॅलेस लॉज मध्ये तीन तरुण थांबले आहेत. त्यांच्याकडे काही बनावटी नोटा आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दीपक सरोदे आपल्या टीम सह लॉज मध्ये पोहोचले. लॉज मधील एका रूममध्ये तीन तरुण मिळून आले. त्यांची रूमची तपासणी केली असता या रूममध्ये पोलिसांना दोन लाख बनावटी नोटा सापडले. दोनशे रुपयांचा हे सर्व नोट आहेत. महात्मा फुले पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मोहम्मद अरिफ, सुरत पुजारी आणि करण रजक अशा या तीन आरोपींची नावे आहेत.

यामध्ये करन जक हा कल्याण पूर्व येथील पत्री पूल ला राहतो करण हा रिक्षा चालवतो. सुरज पुजारी हा देखील पत्रीपुल्ला राहतो. सुरज हा हमालचा काम करतो. यामधील मोहम्मद अरिफा उत्तर प्रदेशचा राहणार आहे. काही दिवसापूर्वी तो देखील पत्री पूल राहायचा. दुकानदारांकडून काहीतरी वस्तू घ्यायचे आणि हे बनावटी नोटा त्यांना द्यायचे अशी यांची बनावट नोटा बाजारात चालवायची पद्धत होती. या तिघांनी या नोटा दिल्लीहून आणल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यांच्या मुख्य सूत्रधार दिल्लीमध्ये असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. मात्र पोलिसांच्या या कामगिरीच्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये