ताज्या बातम्या

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड झाले देशाचे 50 वे सरन्यायाधीश; घेतली शपथ!

न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांनी आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांनी आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला असून त्यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सुमारे सात वर्षे आणि चार महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले, सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील CJI चा त्यांचा सर्वात मोठा कार्यकाळ होता.

22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत ते सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी राष्ट्रीय राजधानीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात BA ऑनर्स केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल, यूएसए मधून LLM आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे.

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून 1998 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची जागा घेतील.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी