ज्युनियर आर्टीस्टचा सप्लाय करणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीमधील एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका ज्युनियर आर्टीस्टनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज मुंबईत घडली. या घटनेनंतर मनसेच्या चित्रपट सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच स्वत: शालिनी ठाकरे यांनी स्वत: जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ज्युनियर आर्टीस्टची भेट घेतली. या प्रकरणात गुड्डू सुरी नावाच्या एका सप्लायरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ज्युनिअर आर्टीस्ट सर्फराज उर्फ मम्मू याची आर्थिक फसवणूक करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयसीस युनियन पदाधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी मनसेनं केली आहे. च्या जाचक व मानसिक त्रासाला कंटाळून कलाकार, तंत्रज्ञ आत्महच्या करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी आर्ट डायरेक्टर राजू सपाटे यांनी आत्महत्या केली होती.