पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल सुरेंद्र अगरवाल, आई शिवानी, ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
याच पार्श्वभूमीवर आज विशाल, शिवानी अग्रवालसह 6 जणांच्या जामिनाचा निकाल येणार असून आरोपींच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी आता पुणे कोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.