रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरोधात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने वादळी शतक ठोकून इतिहास रचला आहे. बटलरने त्याच्या १०० व्या आयपीएल सामन्यात शतक ठोकण्याची कमाल केली. आयपीएलच्या १०० व्या सामन्यात शतक ठोकणारा बटलर दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी के एल राहुलने असा कारनामा केला होता. याशिवाय बटलरने एक असा विक्रम केला आहे, ज्याने ख्रिस केल आणि शुबमन गिललाही मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे आयपीएल करिअरच्या १०० सामन्यांमध्ये बटलर सर्वात जास्त शतक ठोकणारा फलंदाज बनला आहे.
बटलरने त्याच्या १०० आयपीएल सामन्यांमध्ये एकूण सहा शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे. ख्रिस गेलने त्याच्या १०० आयपीएलच्या सामन्यांत एकूण ५ शतक ठोकले आहेत. शुबमन गिलने १०० आयपीएल सामन्यांमध्ये ३ शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. याशिवाय के एल राहुलनेही १०० आयपीएल सामन्यांनंतर ३ शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे. तसंच बटलर आयपीएल इतिहासातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने लक्ष्य गाठताना एकाच संघाविरोधात दोन शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. याआधी २०२२ मध्ये आरसीबी विरोधात धावांचा पाठलाग करताना बटलरने १०६ धावांची नाबाद खेळी केली होती. बटलरचा आयपीएल करिअरमधील हा सहावा शतक आहे, तर टी-२० करिअरमधील सातवा शतक आहे.
टी-२० मध्ये सर्वात जास्त शतक ख्रिस गेलच्या नावावर आहेत. टी-२० मध्ये गेलच्या नावावर एकूण २२ शतक आहेत. तसंच आयपीएल २०२४ च्या १९ व्या सामन्यात विराट कोहलीने त्याच्या आयपीएल करिअरचं ८ वं शतक ठोकलं आहे. तर टी-२० मध्ये विराटने ९ व्या शतकाला गवसणी घातली आहे. आरसीबीने सामन्यात २० षटकांत १८३ धावा केल्या होत्या. विराटने ११३ धावांची नाबाह खेळी केली. परंतु, राजस्थानने ४ विकेट्स गमावून आरसीबीने दिलेलं लक्ष्य गाठलं आणि या सामन्यात विजय मिळवला.
पहिल्या १०० आयपीएल सामन्यांत सर्वात जास्त शतक
जॉस बटलर - ६
ख्रिस गेल - ५
शुबमन गिल - ३
के एल राहुल - ३