ताज्या बातम्या

पुण्यात 35 मंडळांची एकच दहीहंडी फुटणार; उद्योजक पुनीत बालन यांचा पुढाकार

पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पुण्यातील ३५ नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येऊन यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पुण्यातील ३५ नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येऊन यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. शहरातील चौकाचौकात होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेऊन तो टाळण्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळा’चे उत्सव प्रमुख, विश्वस्त व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला आहे.

ऐतिहासिक अशा लाल महाल चौकात हा दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी यासबंधीची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि गुरुजी तालीम मंडळ एकत्र येऊन दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अल्पावधीतच ही दहीहंडी लोकप्रिय ठरली.

दरम्यान शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यातच अनेक मंडळांकडून प्रमुख रस्ते आणि चौकात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे हाल होतात. सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. तसेच प्रत्येक मंडळाने स्वतंत्र दहीहंडी कार्यक्रम आयोजित केल्यास ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. ही बाब लक्षात घेऊन युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळाना एकत्र येऊन संयुक्त दहीहंडी करण्यासंबंधीचे आवाहन केले होते. त्यांच्या सामाजिक भावनेतून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील प्रामुख्याने मध्य पुण्यातील तब्बल ३५ सार्वजनिक मंडळांनी पाठिंबा देत सयुंक्त दहीहंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

संयुक्त दहीहंडीत सहभागी होणारी मंडळे

- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

- श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

- श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

- श्रीमंत पेशवे गणपती मंदिर

- पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती

- नवग्रह मित्र मंडळ ट्रस्ट

- श्री साने गुरुजी तरुण मंडळ

- हुतात्मा भगतसिंग मित्र मंडळ

- त्रिमूर्ती मित्र मंडळ (माणिक चौक)

- जनार्दन पवळे संघ

- सुयोग मित्र मंडळ संयुक्त सिद्धीविनायक मित्र मंडळ

- क्रांतीवीर राजगुरु मंडळ

- श्री हनुमान मंडळ (अग्रवाल तालीम)

- क्रांतीरत्न चंद्रशेखर आझाद मंडळ

- जनता जनार्दन मंडळ

- विजय अरुण मंडळ ट्रस्ट

- व्यवहार आळी चौक मंडळ

- श्री अभिमन्यू मंडळ ट्रस्ट

- श्रीकृष्ण मित्र मंडळ

- फणी आळी तालीम ट्रस्ट

- तरूण शिवगणेश मित्र मंडळ ट्रस्ट

- ऑस्कर मित्र मंडळ

- प्रकाश मित्र मंडळ

- लोखंडे तालीम संघ

- त्वष्टा कासार समाज संस्था

- भोईराज मित्र मंडळ

- थोरले बाजीराव मित्र मंडळ

- भरत मित्र मंडळ

- प्रभात प्रतिष्ठान

- लाल महाल नवरात्रौ उत्सव समिती

- श्री कसबा गणपती शिवजयंती उत्सव मंडळ

- सूर्योदय प्रतिष्ठान, खराडी

- गणेश मित्र मंडळ (अलका चौक)

- श्री गजानन मंडळ (लक्ष्मी रोड)

- गुरुदत्त मित्र मंडळ (मंडई)

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news