तब्बल ९ तासानंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर आले. जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर जयंत पाटील हे जवळच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. आपण ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यम आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “तुम्ही सर्व कार्यकर्ते सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होता. तुम्ही थांबलात तुमचे आभार. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याचं पूर्ण समाधान मी केलं असून, त्यांच्याकडं काही प्रश्न राहिले असतील, असं मला वाटत नाही. मी माझे कर्तव्य पूर्ण पार पाडलं,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.
दरम्यान, आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने समन्स पाठवले होते. त्यानुसार जयंत पाटील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते.