लोकसभा निवडणुकासाठी सर्व चांगलेच तयारीला लागले आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे लोकसभेबाबत जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
जयंत पाटील म्हणाले की, प्रत्येक मतदारसंघात स्थिती बदललेली असताना या तपशीलात पक्षांतर्गत चर्चा केली जाईल. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊपुणे लोकसभेतील बूथ बांधणी मजबूत करण्यासाठी आमदार चेतन तुपे यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.
तसेच तिन्ही पक्षात चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करून जागा वाटपाचा निर्णय घेऊ. पुणे लोकसभेची चर्चा तर होणारच आहे. स्थानिक परिस्थिती बदललेली असते. असे जयंत पाटील म्हणाले.