ताज्या बातम्या

अमित शहाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत? जयंत पाटील म्हणाले...

अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावर शिंदे गटाला विचार करण्याची आवश्यकता असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावर शिंदे गटाला विचार करण्याची आवश्यकता असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

  2. अमित शहा यांच्या भाकितानुसार, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी संधी मिळणार नाही, आणि भाजप देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करणार आहे.

  3. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले की, अमित शहा यांनी शिंदे आणि अजित पवार यांना फडणवीस यांच्या नेतृत्वाची आठवण करून दिली आहे.

पंढरपूर; अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावर एकनाथ शिंदे यांना आता अभ्यास आणि विचार करण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काही संधी मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा भाजपला पुढे करायचा आहे. असे भाकित अमित शहा करतात. अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत आठवण करून दिली आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

माढा विधानसभा मतदारसंघात जाहीर प्रचार सभेसाठी आल्यावर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रसंगी अभिजीत पाटील उपस्थित होते.

अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले. यानंतर जयंत पाटील यांनी अमित शहांच्या विधानाचा विचार आणि अभ्यास एकनाथ शिंदे यांना करण्याची वेळ आली असल्याची खोचक टीका केली आहे तसेच अजित पवार आणि शिंदे यांना संधी मिळणार नाही.असा अर्थ अमित शह यांच्या विधानाचा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Latest Marathi News Updates live: राजकारण्यांना निवडणूक आयोगाच्या कडक सूचना

Nana Patole : पटोलेंकडून शिंदे-फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचे संकेत

Prajaktta Mali: प्राजक्ताच्या प्राजक्तराजमध्ये एक नवा दागिना लॉन्च

Chhagan Bhujbal | भुजबळांबाबत राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकातून मोठा खुलासा, भुजबळ काय म्हणाले?

Nana Patole on Badlapur Case : पटोलेंचे गंभीर आरोप! बदलापूरची 'ती' शाळा जिथे सुरु होतं ब्ल्यू फिल्म अन् अवयव विक्रीचे काम