Admin
ताज्या बातम्या

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे राज्य सरकारचे आदेश

Published by : Siddhi Naringrekar

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवली आहे.

जयंत पाटील यांचे निकटवर्तीय दिलीप पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. बँकेतील नोकरभरती देखील दिलीप पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच झाली. या नोकरभरतीत देखील मोठा घोटाळा झाल्याचा तेव्हापासून आरोप करण्यात आला होता. दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ सत्तेवर आले. या संचालक मंडळानेमोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार केला असा आरोप करण्यात आला होता.

मागील काही वर्षांपासून या बँकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सत्ता आहे. या सरकारने बँकेच्या कारभाराची पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत. बँकेतील नोकर भरतीतील घोटाळा, कर्ज वाटपातील अनियमितता, बँकेच्या कामकाजातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिले आहेत.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ