Devendra Fadnavis vs Jayant Patil  
ताज्या बातम्या

आर्थिक पाहणी अहवालावरून जयंत पाटील- फडणवीस यांच्यात 'ट्वीटर वॉर', उपमुख्यमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले; "जयंतराव..."

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रत्युत्तर दिलं आहे.

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis vs Jayant Patil On Twitter : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात काही बाबी राज्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं आहे.

जयंत पाटील ट्वीटरवर काय म्हणाले?

आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र या अहवालातील खालील बाबी राज्याच्या दृष्टीने मोठी चिंता व्यक्त करणाऱ्या आहेत. याआधी दरडोई उत्पन्नात क्रमांक १ वर असणारे आपले महाराष्ट्र राज्य ६ व्या क्रमांकावर गेले आहे. कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि शेजारचे गुजरात राज्यही आपल्या पुढे आहेत. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षांत महाराष्ट्र हा ५ व्या क्रमांकावर होता. आता आपल्या राज्याची घसरण ६ व्या क्रमांकावर झाली आहे. मधल्या काळात आपल्या राज्यातील जे प्रकल्प इतर राज्यात विशेषतः गुजरातला पाठवण्यात आले त्याचे परिणाम आपल्या महाराष्ट्राला भोगावे लागले हे यातून सिद्ध होते.

देवेंद्र फडणवीस जयंत पाटील यांना प्रत्यत्तर देत ट्वीटरवर काय म्हणाले?

जयंतराव,खोटे बोलायचे तरी किती?बाकीच्यांनी खोटा नरेटिव्ह पसरविला, तर समजू शकते. पण, दस्तुरखुद्ध राज्याचे माजी अर्थमंत्री तेच करीत असतील, तर काय म्हणावे?

महाविकास आघाडीचा काळ आठवून पहा...

2020-21 : 1,82,454 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)

2021-22 : 2,19,573 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)

आणि आता

2022-23 : 2,52,389 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)

आपल्या बाकीच्याही आरोपांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलतीलच.

पण, महाराष्ट्राची बदनामी किमान आपल्या हातून तरी होऊ नये, ही अपेक्षा!

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश