मराठवाड्याची पाणी चिंता मिटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यामुळे जायकवाडी धरण तब्बल 87 टक्के भरलं आहे. पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन महिनाभरात जायकवाडी धरण 100% भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच जोरदार पडणाऱ्या पावसामुळे आता मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटल्याचे पाहायला मिळत आहे. धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे.