दसऱ्यानिमित्त आज बीडमध्ये दोन दसरा मेळावे पार पडले. भगवानगडावर आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. तर नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण आता आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करेन, तेव्ही मी जे सांगेन ते सर्वांनी ऐकायचं. सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.