Jammu Kashmir|Pakistani Terrorist team lokshahi
ताज्या बातम्या

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची कारवाई, 24 तासात 4 दहशतवादी ठार

ही चकमक शोपियानमधील बडीमार्ग-अलौरा भागातील बागांमध्ये झाली

Published by : Shubham Tate

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांनी तीन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. ही चकमक शोपियानमधील बडीमार्ग-अलौरा भागातील बागांमध्ये झाली. (jammu kashmir encounter one terrorist killed in shopian)

नदीम अहमद असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो कुलगामचा रहिवासी आहे. नदीम हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असून अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. नदीमचा कुपवाडा येथील पंच हत्येतही सहभाग आहे.

आदल्या दिवशी, दोन लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी, ज्यापैकी एकाचा पाकिस्तानशी संबंध होता, कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुपवाड्यातील चकतरस कंडी भागात दहशतवादी असल्याच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.

याआधी सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला, तर तीन दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोपोरच्या जलूर भागातील पाणीपुरा जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवर कारवाई करत, सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.

ते म्हणाले की तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचार्‍यांवर गोळीबार केला. त्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले आणि प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. काश्मीर प्रदेशाचे पोलिस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news