जालना येथील अंतरवली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केला आहे. यावर सर्वच स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्रीचं याला जबाबदार असल्याच आरोप केला आहे.
त्या म्हणाल्या की, अतिशय संतापजनक परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे. मी या लाठीचार्ज आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्रलयाचा जाहीर निषेध करते. कारण ज्या अनामुषपणे त्या मुलांवर हल्ला केला. चार दिवस झाले तिथे आंदोलन चालू आहे. गृहमंत्र्यांना महिती नव्हतं का इथं आंदोलन चालू आहे ते? आणि शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू होते. आज अशी कोणती घटना झाली की एवढं लाठीचार्ज आणि ज्या पद्धतीने अमानुषपणे आपल्या मराठी आणि महाराष्ट्रातल्या मुलांना मारत होते.
तिथे काय झालं हे मला माहित नाही पण जर तिथे चार दिवस आंदोलन चालू होतं तर तिथे इंटेलेजन्स आणि यंत्रणा काय करत होती? एवढी मंत्री आहेत तिथे जाऊ शकले नसते. विरोधकांना नाव ठेवायची फक्त एवढीचं या सरकारच काम आहे. यापैकी का नाही त्यांच्याशी शांततेने चर्चा केली. फक्त विरोधकांना नाव ठेवायंची आणि कामं तर काही करायची नाही राज्यामध्ये. गृहमंत्रलयांनीच याचं उत्तर द्यावं. गृहमंत्रीचं याला जबाबदार असल्याच आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.