ताज्या बातम्या

देशात विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा जगदीश उईके अटकेत

देशात विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्रकरण समोर आलं आहे. आरोपीची सायबर सेलकडून कसून चौकशी सुरू असताना चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात जाणून घ्या

देशात विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्रकरण

धमकी देणारा आरोपी जगदीश ऊइके अटकेत

आरोपीची सायबर सेलकडून कसून चौकशी सुरू

चौकशीत दिशाभूल करण्याचा आरोपीचा प्रयत्न

देशात विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्रकरण समोर आलं आहे. आरोपीची सायबर सेलकडून कसून चौकशी सुरू असताना चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला, या आरोपीचं नाव आरोपी जगदीश ऊइके असून त्याला आता अटक करण्यात आली आहे. दहशतवाद संधर्भात त्यांनी लिहिलेले पुस्काचे प्रकाशन व्हावे यासाठी धमकीचे ईमेल पाठविल्याची पोलिसांना माहिती दिली आहे. त्याचे शिक्षण अकरावी पर्यंत झाल्याच दावा त्याने केलाय, मात्र सराईत पणे ईमेल ड्रॉफ्टींग करणारा आरोपी उच्च शिक्षीत असल्याचा पोलिसांना संशय होता. 2011 मध्ये दहशत वादावर लेख लिहिल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.

पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे असे त्याला वाटत होते. त्याकरिता त्यांनी अनेक ईमेल केले मात्र तिकडून काहीच उत्तर न आल्याने लाईन लाईट मध्ये येण्यासाठी असा प्रकार केल्याचा पोलिसांना संशय आहे. जगदीशच्या ईमेलवरून आतापर्यंत विविध प्रकारचे 354 मेल गेले त्यातील 36 ईमेल धमक्याचे होते. जगदीश उईके याच्या स्वभावाबाबत अद्याप पोलिसांना नेमकी कल्पना आली नाही. तो मानसिक दृष्ट्या आजारी तर नाही याची मानसोपचार तज्ञ कडून तपासणी करण्यात येणार अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का