हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 59 टक्के पाऊस झाला आहे. पावसाळा होऊन दोन महिने उलटले तरीही हिंगोली आणि परभणी जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या येलदरी धरणात केवळ ते 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही आहे. जिल्ह्यात केवळ 59 टक्के पाऊस झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.
हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न येलदरी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने यावर्षी पाणी पातळीत वाढ झाली नाही, त्यामुळे आता तिन्ही जिल्ह्यांचा पाणी प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 809.770 दलघमी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पात सध्या 393.071 दलघमी एवढाच पाणीसाठा झाला आहे. पावसाळ्यातील आणखी दोन महिने शिल्लक असून या काळात प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.