ताज्या बातम्या

इस्रोकडून 'बेबी रॉकेट' आज अंतराळात झेपावले, 750 विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'आझादी सॅट'चं प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Launch Vehicle (SSLV) असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Launch Vehicle (SSLV) असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. या रॉकेट प्रक्षेपकाची निर्मिती इस्रोने केली असून याचे पहिले उड्डाण हे आज झाले आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरोनं (ISRO) देशवासीयांना मोठं गिफ्ट दिलंय.

इस्रोच्या बेबी रॉकेटनं अर्थात SSLVनं ईओएस-02 आणि आझादी सॅट या उपग्रहांचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केलंय. 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोनं SSLV अर्थात स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेईकलची निर्मिती केलीय. इस्रोच्या नव्या रॉकेटची उंची 34 मीटर, व्यास 2 मीटर आणि वजन 120 टन इतके आहे. 10 ते 500 किलो वजनाच्या उपग्रहांना जमिनीपासून 500 किमी उंचीवरील कक्षेत पाठवण्याची क्षमता एसएसएलव्ही रॉकेटकडे आहे. फक्त एका आठवड्याच्या कालावधीत, कमी मनुष्यबळाच्या साह्याने या रॉकेटची जोडणी शक्य आहे. त्यामुळे रॉकेटच्या उड्डाणाचा खर्चही कमी होणार आहे.

काय आहे खास

हे देशातील पहिले छोटे उपग्रह प्रक्षेपण वाहन आहे. पूर्वी, लहान उपग्रह सूर्य समकालिक कक्षासाठी पीएसएलव्हीवर अवलंबून होते, तर मोठ्या मोहिमांमध्ये जिओसिंक्रोनस ऑर्बिटसाठी जीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही मार्क 3 वापरला जात असे. पीएसएलव्ही लाँच पॅडवर आणण्यासाठी आणि असेंबल करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात, परंतु एसएसएलव्ही केवळ 24 ते 72 तासांत एकत्र केले जाऊ शकते. तसेच, ते अशा प्रकारे डिझाइन केले आहे की ते कधीही आणि कोठेही लॉन्च केले जाऊ शकते. एसएसएलव्हीच्या आगमनाने प्रक्षेपणांची संख्या वाढेल, आम्ही पूर्वीपेक्षा जास्त उपग्रह प्रक्षेपित करू शकू, त्यामुळे भारताची व्यावसायिक बाजारपेठेतही नवी ओळख निर्माण होईल, तसेच भरपूर नफाही होईल. कमाईच्या बाबतीत. या मायक्रो, नॅनो किंवा 500 किलोपेक्षा कमी वजनाचा कोणताही उपग्रह पाठवला जाऊ शकतो.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव