IPL 2024 Points Table 
ताज्या बातम्या

IPL 2024 : मुंबई आणि लखनऊच्या विजयानं गुणतालिकेचं समीकरण बदललं, 'टॉप ४'ची शर्यत झाली रंगतदार

Published by : Naresh Shende

आयपीएल हंगामात ७ एप्रिलला झालेल्या डबल हेडर सामन्यात मुंबई आणि लखनऊच्या संघाने बाजी मारली. लखनऊने गुजरात टायटन्सचा पराभव करून गुणतालिकेत भरारी घेतली आहे. आयपीएल २०२४ च्या २० वा सामन्यात मुंबईचा विजय झाला. या हंगामात मुंबईला पहिला विजय मिळाला आहे. तर २१ व्या सामन्यात लखनऊच्या संघाने विजय संपादन केलं. त्यामुळे मुंबई आणि लखनऊने गुणतालिकेतील टॉप-४ ची शर्यत रंगतदार केली आहे. पहिला विजय मिळाल्याने मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानावरून आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर लखनऊने तिसरा विजय मिळवला असून गुणतालिकेत त्यांनी तिसऱ्या नंबरवर उडी घेतली आहे.

पंजाब आणि आरसीबीच्या अडचणीत वाढ

मुंबईने पहिला आणि लखनऊने तिसरा विजय मिळवल्याने आरसीबी आणि पंजाब किंग्जच्या समीकरणाला धक्का बसला आहे. पंजाबने आतापर्यंत फक्त दोन सामनेच जिंकले आहेत. तर मुंबईच्या विजयामुळे गुणतालिकेचं समीकरण बदललं आहे. आरसीबी आता नवव्या स्थानावर आहे.

राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर

आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत पहिल्या नंबरवर राजस्थान रॉयल्सचा संघ पोहोचला आहे. दुसऱ्या नंबरवर केकेआर, तिसऱ्या नंबरवर लखनऊ आणि चौथ्या नंबरवर चेन्नई सुपर किंग्जचा संघ आहे. पाचव्या नंबरवर हैदराबाद, सहाव्या नंबरवर पंजाब किंग्ज, सातव्या नंबरवर गुजरात टायटन्स, आठव्या नंबरवर मुंबई, नवव्या स्थानावर आरसीबी आणि शेवटच्या दहाव्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे.

विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप आहे. कोहलीने ५ सामन्यांमध्ये ३१६ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर साई सुदर्शन आहे. साईने आतापर्यंत ५ सामन्यांमध्ये १९१ धावा केल्या आहेत. यानंतर तिसऱ्या नंबरवर रियान पराग आहे. परागने ४ सामन्यांमध्ये १८५ धावा केल्या आहेत. शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर आहे. गिलने ५ सामन्यांमध्ये १८३ धावा केल्या आहेत. तर संजू सॅमसन पाचव्या स्थानावर आहे. संजूने ४ सामन्यांमध्ये १७८ धावा केल्या आहेत.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?