आयपीएल २०२४ च्या १६ व्या सामन्यानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं आहे. केकेआरचा संघ आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठ्या फरकानं पराभूत केलं. त्यामुळे केकेआरचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. केकेआरचा एकाही सामन्यात पराभव झाला नाहीय. कोलकाताने तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे केकेआरचा नेट रनरेटही वाढला आहे. +2.518 असा केकेआरचा आताचा रनरेट आहे. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. तर सीएसके गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
आरसीबीचा पराभव करून लखनऊ सुपर जायंट्सने टॉप ४ मध्ये प्रवेश केला आहे. लखनऊचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर गुजरात टायटन्स, सहाव्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज सातव्या स्थानी आहे. केकेआरने पराभव केल्यानं दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर पोहोचले. तर आरसीबी, मुंबई इंडियन्स शेवटच्या आठव्या क्रमांकावर आहे.
एकाचवेळी तीन संघांना मोठा धक्का
केकेआर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचल्यावर तीन संघांना धक्का बसला आहे. दिल्ली, आरसीबी आणि मुंबई इंडियन्सच्या संघासाठी पुढील प्रवास कठिण झाला आहे. या तिन्ही संघांना पुढील सामन्यांमध्ये विजय संपादन करावा लागणार आहे.
सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज
विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप आहे. कोहलीने ४ सामन्यांमध्ये २०३ धावा केल्या आहेत. रियान पराग दुसऱ्या स्थानावर आहे. परागने तीन सामन्यांमध्ये १८१ धावा केल्या आहेत. तर हेनरिक क्लासेन तिसऱ्या स्थानावर आहे. क्लासेनने ३ सामन्यांमध्ये १६७ धावा केल्या आहेत. रिषभ पंत चौथ्या क्रमांकावर आहे. पंतने आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये १५२ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने चार सामन्यांमध्ये १४८ धावा केल्या आहेत.