तुरुंगातील महिला कैदी मोठ्या प्रमाणात गर्भवती होत असून आतापर्यंत तुरुंगात १९६ मुलांचा जन्म झाला आहे, असा दावा ॲमिकस क्युरीने गुरुवारी (८ फेब्रुवारी) कोलकाता उच्च न्यायालयात केला. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली. हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचं म्हणत कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
तुरुंगातील महिला कैद्यांना कोण गर्भवती करतंय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, असे आदेशच सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून सुरू होईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.
1 जानेवारी 2024 च्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये असलेल्या 60 वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये सुमारे 26 हजार महिला कैदी बंद आहेत.
हे प्रकरण अहवालासहित खंडपीठासमोर मांडलं. इतकंच नाही, तर सुधारगृहातील पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कैद्यांना ठेवलेल्या परिसरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी खंडपीठासमोर केली.