सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे. देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झालेली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 39 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. गॅस सिलेंडरचे नवे दर आज सकाळी 6 वाजल्यापासुन लागू करण्यात आले आहेत.
आजपासून राजधानी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 39 रुपयांनी महाग झाला आहे. आता दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1652.50 रुपयांवरून वाढून 1691.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 38 रुपयांनी वाढून 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपये झाली आहे. यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांसाठी खर्चाचे नियोजन करण्यासाठी पगाराची 01 तारीख महत्त्वाची असते. या 01 तारखेला दर महिन्यात काही गोष्टी स्वस्त होतात तर काही गोष्टी महाग होतात. आता या आज 01 सप्टेंबर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 39 रुपयांनी वाढ झाल्यामुळे याचा फटका छोट्या व्यावसायिकांसह सर्वसामान्यांनाही बसणार आहे.