संगमनेर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांची तब्येत बिघडली असून 30 मेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. इंदोरीकर महाराजांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. यासंदर्भात एक पत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.
या पत्रकात म्हंटले की, इंदोरीकर महाराजांची प्रकृती बिघडली असून येत्या 30 मेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत. इंदोरीकर महाराजांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीवर पाठवले आहे. तर लवकरच बरा होऊन मी आपणा सर्वांच्या सेवेत येणार आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत, असे देखील इंदोरीकर महाराजांनी सांगितले आहे. आपल्याला होणार्या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही इंदोरीकर महाराजांनी सांगितले आहे.
दरम्यान, याआधी इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातातून इंदुरीकर महाराज थोडक्यात बचावले होते. त्यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. परंतु, त्यांच्या गाडीचा चालक मात्र किरकोळ जखमी झाला होता. परतूरमध्ये ही घटना घडली होती.