अमोल धर्माधिकारी, पुणे
इंद्रायणी नदीचं पाणी प्रदूषित झालं असून याच पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदूषणाकडे सरकारचं आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना हे दूषित पाणी पाजल्याचे दिसून आलेलं आहे. यावरुन तरी त्यांना इंद्रायणी नदी किती दूषित झाली आहे हे समजेल यासाठी त्यांना पाणी पाजल्यात आल्याचे म्हटले जात आहे.
तसेच लवकरात लवकर नदी स्वच्छ करावी, नदीत येणारे रसायनयुक्त पाणी बंद करावे ही मागणी करण्यात आली आहे.